भगूर- नानेगावचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 07:37 PM2019-08-04T19:37:47+5:302019-08-04T19:43:05+5:30
इगतुपुरी तालुक्यात दिवसभरात सुमारे 190 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे दारणा धरणातून सुमारे 40 हजार 342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धारणा नदीला पूर आला आहे. दारणा नदीपात्राच्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने धारणेने नदीपात्र ओलांडले असून भगूर व नानेवला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने नानेगावचा संपर्क तुटला आहे.
नाशिक : इगतुपुरी तालुक्यात दिवसभरात सुमारे 190 मिलीमीटर पाऊस कोसळल्यामुळे दारणा धरणातून सुमारे 40 हजार 342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धारणा नदीला पूर आला आहे. दारणा नदीपात्राच्या क्षमतेपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने धारणेने नदीपात्र ओलांडले असून भगूर व नानेवला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने नानेगावचा संपर्क तुटला आहे. एकीकडे नानेगाव भगूरला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाला असताना दुसरीकडे पळसे गावापर्यंत पाणी आत शिरल्याने नानेगावाचा दुसरा मार्गही बंद झाला असून आता नानेगावमध्ये पोहचण्यासाठी गावकऱ्यांना 20 किलमोटीरचे अंतर कापून नाशिक साखर कारखान्याच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो आहे. दरम्यान, इगतपुरीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा नदी दुथडी भरून वाहत असून नाणेगावचे नदीकाठचा घाट व दशक्रीया विधीसाठी बांधण्यात डोम पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या घरांपर्यंत पुराचे पाणी पोहोचल्याने नदीकाठच्या गावांनी स्थलांतर केले आहे.