भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:44 AM2018-09-11T00:44:35+5:302018-09-11T00:44:57+5:30

शहरातील मेनरोड ते शिवाजी चौक व भगूर नगरपालिकेपर्यंत मुख्य विविध रस्त्यावरील बेकायदेशीर दुकाने हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना दिले आहे.

Bhagur Palika is apathetic about encroachment | भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन

भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन

Next

भगूर : शहरातील मेनरोड ते शिवाजी चौक व भगूर नगरपालिकेपर्यंत मुख्य विविध रस्त्यावरील बेकायदेशीर दुकाने हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना दिले आहे.
यासंदर्भात भगूर नगरपालिकेच्या सभेत बेकायदेशीर दुकानांचे अतिक्रमण हटाव ठराव मंजूर झालेला असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. नगरपालिका काहीच कार्यवाही करीत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून न्यायालयात न्याय मागण्यात येणार असल्याचे विलास पिंगळे, संतोष गवारे, विनोद लोट, राहुल थोरात, संतोष हेंबाडे, साईनाथ पठाडे, दीपक सातपुते, अरविंद गवळी यांनी म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माझी नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भगूर गावात दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो परंतु हा बाजार मूळ जागेवर न भरता यातील दुकानदार विविध दुकाने विद्यमान नगरसेवक कविता कैलास यादव यांच्या घरासमोरून डॉ. अमृतकर दवाखाना रस्ता ते सावरकर स्मारकापर्यंत लावतात. यावेळी नागरिकांना पायीचालणे अवघड होऊन नागरिक व दुकानदारात नेहमीच वाद होतात. नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती करूनही कारवाई होत नाही.
दुर्घटनेची शक्यता
भगूर शहरात अनेक दुकानदारांनी मनमानी करून बेकायदेशीरपणे दुकाने थाटली असून, त्यामुळे रस्त्यावरून जाणाºया-येणाºया लोकांना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरावा लागतो. या अतिक्रमणामुळे मोठी दुर्घटना होऊन नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Bhagur Palika is apathetic about encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक