भगूरला चार अपक्ष आजमावणार नशीब

By admin | Published: November 17, 2016 11:22 PM2016-11-17T23:22:42+5:302016-11-17T23:23:59+5:30

भगूरला चार अपक्ष आजमावणार नशीब

Bhagur will try four independent candidates | भगूरला चार अपक्ष आजमावणार नशीब

भगूरला चार अपक्ष आजमावणार नशीब

Next

 भगूर : येथील नगरपालिका निवडणुकीत यावेळी अपक्ष उमेदवारांची संख्या घटली असून, या निवडणुकीत विविध प्रभागांतून जातीच्या, ओळखीच्या व आर्थिक परिस्थितीच्या आणि एखाद्या राजकीय उमेदवारास पराजित करण्यासाठी, तर जय-पराजयाचे डावपेच आखण्यासाठी राजकीय नेत्यांनी चार अपक्ष उमेदवार उभे केले असून, ते पण आपले नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १ ते ४ होते. १७ नगरसेवक जागांसाठी ४४ जण उमेदवारी करीत होते. त्यासाठी १० अपक्ष होते आणि नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड होती. तत्कालीन वेळी भगूरच्या मतदारांनी राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून दिले; मात्र एकाही अपक्षाला निवडून तर दिलेच नाही परंतु त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हीच धास्ती घेऊन यावेळी ५५ उमेदवार निवडणूक लढवित असून, अपक्ष फक्त चार उभे आहेत, तर नगराध्यक्ष जनतेतून निवडला जात आहे. प्रभाग ६ ब मधून जनरल जागेसाठी विद्यमान नगरसेवक चेतन बागडे, प्रभाग ४ ब मधून जनरल महिला जागेसाठी प्राजक्ता बागडे, प्रभाग ७ ब जनरल जागेतून विलास पिंगळ आणि प्रभाग ६ ब जनरलमधून दत्ताजी कुवर असे चार अपक्ष आपले नशीब आजमावत आहेत.
यातील विद्यमान नगरसेवक चेतन बागडे यांना भाजपा आघाडीचे तिकीट न मिळाल्याने आणि हे प्रथमपासून शिवसेना विरोधक असल्याने आपली ताकद दाखविण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली तसेच त्यांच्या चुलत भावजय या उच्चशिक्षित असताना शिवाय गावात बागडे कुटुंबीयांच्या मदतीची जास्त मतदार संख्या असल्याने आणि चांगल्या संबंधाचे योगदान असताना प्राजक्ता बागडे यांनाही उमेदवारी डावलल्याने तेली समाजात नाराजीमुळे प्रभाग ब मधून निवडणूक लढत आहे. हे अपक्ष चेतन बागडे व प्राजक्ता बागडे दीर-भावजय ज्या प्रभागातून अपक्ष उभे आहेत तिथे त्यांच्या तेली समाजाचे मतदान जास्त असून, नातेगोते आणि इतर मराठा समाजाच्या मिळणाऱ्या मतांमुळे विजयाची अपेक्षा आहे. मात्र येथील राजकीय पक्षाच्या उमेदवारास तेली समाज, मराठा व इतर समाजाने मतदान केले तर यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दत्ताजी कुवर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असून, त्यांनाही आघाडीकडून उमेदवारी मिळण्यास अडचण ठरली व इतर पक्षातही विचार केला नाही, त्यामुळे मराठा समाजाच्या कुवर परिवाराचे जास्त मतदार असल्याने त्या जोरावर ते अपक्ष उमेदवारी करीत आहे. ते प्रभाग ६ ब मधून असून, राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पाडण्यास कारणीभूत ठरतील असेही दिसते.
प्रभाग ७ ब मधून विलास पिंगळ हे प्रथमपासून अपक्ष लढवित आहे.

त्यांचे वडील विठ्ठल पिंगळ शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. ते मृत्यू पावल्यानंतर या कुटुंबाचा शिवसेनेशी संपर्क तुटला. या अपक्ष विलास पिंगळ यांनी मागील पंचवार्षिक निवडणुृकीत आपल्या पत्नीची अपक्ष उमेदवारी लढवून प्रयत्न केला; मात्र यश आले आणि तरीदेखील आपल्या वडिलांच्या राजकीय विकास कामांवर आणि आपल्या प्रभागातील मराठा समाज मतदारांच्या जिवावर अपक्ष लढण्याची हिंमत केली आहे.
 

Web Title: Bhagur will try four independent candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.