लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषा दिन : शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:21 AM2018-02-28T01:21:18+5:302018-02-28T01:21:18+5:30
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर शाळेत कविवर्य कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ग.ंपा. माने, संचालिका सुनंदा माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा जाधव यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच मराठी भाषेची थोरवी सांगणारे विचार विद्यार्थ्यांनी भाषणातून मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी कासार यांनी केले. आभार कैलास पवार यांनी मानले. न्यू इरा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वैशाली झनकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचप्रमाणे कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कथेतील विविध पात्र साकारली. यावेळी काव्य आणि गायन स्पर्धा घेण्यात आल्या.