लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:00 AM2018-11-11T01:00:29+5:302018-11-11T01:00:48+5:30
मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली.
नाशिक : मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली.
मुंबई नाका, भाभानगर येथे झालेल्या या मैफलीत सारेगामा लिटील चॅम्प विजेती अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड तसेच अंगद गायकवाड यांची गीतांची मैफल रंगली. यावेळी अंजली गायकवाड यांनी अल्ला तेरो नाम, गोऱ्या गोºया, लग जा गले, हवा के झोके तसेच भक्तिगीतांसह विविध गिते सादर केली. त्यानंतर संगीतकार संजय गिते यांनी सूर निरागस हो, लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, विठ्ठला रे पांडुरंगा, माझ्या देवीचा गोंधळ आदी गिते सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आयोजन उपमहापौर प्रथमेश गिते यांनी केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, माजी महापौर यतिन वाघ, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विनीता सिंगल, हिमगौरी आडके, अजिंक्य साने, भगवान दोंदे, अर्चना थोरात, सुमन भालेराव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शेवाळे यांनी केले.