भागवतातील भक्तीही नवविधा भक्ती : मुतालिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:33 AM2018-04-01T01:33:44+5:302018-04-01T01:34:01+5:30
आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले. आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय.
उपनगर : आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले.आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत ‘नवविधा भक्ती’ या विषयावर बोलताना मुतालिक पुढे म्हणाल्या की, नवविधा भक्ती दोन प्रकारची असते. एक रामायणातील व दुसरी भागवतातील. रामायणात रामाने शबरीला जो उपदेश केला आहे ती नवविधा भक्ती होय. भक्ती ही करायची नसते तर ती आपोआपच घडत असते. नवविधा भक्तीचे नऊ टप्पे आहेत. शेवटचा टप्पा हा आत्मनिवेदनाचा आहे. भक्तीबद्दल समर्थांनी विभक्त नव्हे तो भक्त असे सांगितल्याचे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी मंचावर ज्योतीराव खैरनार, सुधीर शिरवाडकर, अॅड. भानुदास शौचे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. डी. आणेकर व आभार सुरेश कुलकर्णी यांनी मानले. आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे जन्मोत्सव, डॉ. राजेंद्र मुळे यांचे देहातील हनुमंताचे स्थान यावर व्याख्यान होणार आहे. दुपारी नैवेद्य आरती व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर पराग पांडव व त्यांचे सहकारी यांचे संगीत रामदासायन, दुपारी ३ वाजता दिलीप भट प्रस्तुत सुयोग वाद्यवृंदाचा गायनाचा व सायंकाळी मनीषा बाठे यांचे समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्यातील भक्तीयोग या विषयावर व्याख्यान रात्री साडेआठ वाजता ऋतुजा नाशिककर, स्वराली व नितीन जोगळेकर यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे.