भैरवनाथ महाराज मंदिर जीर्णोध्दार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:39+5:302021-06-22T04:10:39+5:30
--------------------------- पाटोळे येथे कृत्रिम पाणीटंचाई सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात ...
---------------------------
पाटोळे येथे कृत्रिम पाणीटंचाई
सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामपंचायतीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीजबिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संगीता आव्हाड, उपसरपंच जिजा खताळे व सदस्यांनी गावास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
---------------------------------
गोळीबार प्रकरणातील संशयित फरारच
सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथे चारित्र्याच्या संशयावरून दांपत्यावर गोळीबार करणारा संशयित अद्याप फरारच आहे. शिवडे येथे संशयित अशोक मेंगाळ याने गावठी कट्ट्यातून पती-पत्नीवर गोळीबार केला होता. त्यात जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित दुसऱ्या दिवशीही फरार होता. अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.
-----------------------------
पाताळेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात राष्ट्रीय खेळाडू स्नेहल रेवगडे हिच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयात शिकणारी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी स्नेहल संतोष रेवगडे हिने तिच्या दहावीमध्ये शिकणाऱ्या मैत्रिणीसह विद्यालयात येऊन एक मूल, एक झाड ही संकल्पना रुजवत विद्यालयात वृक्षारोपण केले. यावेळी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान रेवगडे, बी. आर. चव्हण, आर. व्ही. निकम, आर. टी. गिरी, एस. एम कोटकर, एम. सी. शिंगोटे, एम.एम.शेख,सौ. सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, रमेश ढोली उपस्थित होते.
-------------------------
‘अर्सेनिक अल्बम’ गोळ्यांचे वाटप
सिन्नर : शहरातील कानडी मळा परिसरात कोरोनाकाळात नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे विभागप्रमुख अक्षय कानडी यांनी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला. कानडी मळा परिसरात घरोघरी जाऊन अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. सप्निल कानडी, प्रतीक कानडी, मंगेश कानडी, राहुल कानडी, योगेश माळी, सर्वेश कानडी, हनुमंत तांबे आदी उपस्थित होते.