वटार येथे राम मंदिरात भजन, अभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:52 PM2020-08-05T21:52:31+5:302020-08-06T01:35:06+5:30
वटार : अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वटार राममंदिर परिसरात सडा रांगोळ्या, रोषणाईने राममंदिर परिसर फुलून गेला होता. गावात प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळ्या घालून दारासमोर गुढी उभारून भूमिपूजनाचे स्वागत करण्यात आले.
वटार : अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वटार राममंदिर परिसरात सडा रांगोळ्या, रोषणाईने राममंदिर परिसर फुलून गेला होता. गावात प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळ्या घालून दारासमोर गुढी उभारून भूमिपूजनाचे स्वागत करण्यात आले. सरपंच कल्पना खैरनार व जिभाऊ खैरनार यांच्या हस्ते राममंदिरात मूर्तीचे पूजन करून भजनास सुरु वात केली. उपसरपंचपद जितेंद्र शिंदे यांनी गळ्यात टाळ घालून भजनाच्या चालीवर नृत्य केले. जणू काही गावाला उत्सवाचे रूप आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिर परिसर सॅनिटाइज करण्यात आला. तरु ण मंडळीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी जिभाऊ खैरनार, राजेंद्र खैरनार, दौलत बागुल, किसन शिंदे, हरिचंद्र अहिरे, ग्रामसेवक वसंत भामरे, डॉ. राजेंद्र सोनवणे. समवेत भजनी मंडळींमध्ये खंडू बागुल, बाळू खैरनार, दशरथ खैरनार, राजेंद्र बागुल, पोपट गांगुर्डे, श्रावण बागुल, महिपत गांगुर्डे, मन्साराम गांगुर्डे, गणपत गांगुर्डे, गोकुळ खैरनार, निंबा खैरनार, उद्धव खैरनार, दिनेश खैरनार, कडू बच्छाव, पंढरीनाथ बागुल, महादू खैरनार आदी उपस्थित होते.