भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:27 AM2018-07-23T00:27:32+5:302018-07-23T00:27:49+5:30

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो.

 Bhajan, Kirtana happens through public awareness | भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

Next

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानंतरदेखील सुमारे सातशे वर्षांपासून वारीचा हा उपक्रम निरंतर सुरूच आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा विश्वस्त आणि पुजारी म्हणून कार्य करीत असताना इ.स.२००० पासून दरवर्षी मी पंढरीच्या वारीला जात आहे. हा एक अलौकिक अनुभव आहे. वारी सुरू असताना पालखीच्या प्रारंभापासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर दिनक्रम ठरलेला असतो. त्यात कोणताही बदल होत नाही. मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर पहाटेच वारकरी उठतात. प्रात:विधी आटोपल्यानंतर काकड आरती, भजन होते. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता पालखीचे प्रस्तान होते. सकाळी एखाद्या ठिकाणी नास्ता होतो. दुपारी वाटेत जेवण होते. पुन्हा मार्गक्रमण सुरू होते. प्रत्येकजण मुखाने हरिनाम म्हणत पायवाट चालत राहतो. पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर सायंकाळी आरती होते. रात्री ७ वाजता कीर्तन आणि त्यानंतर प्रबोधनात्मक प्रवचन होते. काही ठिकाणी भजनाचा जागर होते. महाप्रसादानंतर रात्रीची विश्रांती असते. पुन्हा नव्याने दिनक्रम सुरू असतोे. ज्या गावाला पालखी, दिंडीसोबतचे वारकरी पोहचतात. तेथील लोकांचेही प्रबोधन व्हावे यासाठी कीर्तन, प्रवचन आणि लोकजनजागृतीचे कार्य करण्यात येते. तसेच रात्री भजन-कीर्तनामुळे वारकऱ्यांना शारीरिक श्रम जाणवत नाही. संतांच्या विचारामुळे मानसिक उभारी मिळते. वेदामध्ये कर्माला म्हणजे दैनंदिन कामाला उपास्यदैवत म्हटले आहे. पूर्वी वाहने नव्हती म्हणून पायी वारीची प्रथा होती. परंतु आता बस आणि अन्य वाहनांनीदेखील लोक वारीला जातात. काळानुरूप हा बदल झालेला आहे.
पंढरपूर येण्यापूर्वी वाखारी येथे राज्यभरातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांचा मेळा जमतो. संत निवृत्तिनाथ हे आद्यपीठ असल्याने संत त्र्यंबकेश्वर येथून झालेल्या पालखीच्या दर्शनासाठी अन्य दिंड्यांमधील वारकरीदेखील येतात.‘विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप, विठ्ठल आमुचा सखा! अशी भावना प्रत्येक वारक-यांच्या ठायी आपल्याला दिसून येते. - जयंत महाराज गोसावी ,  (लेखक, संत निवृत्तिनाथ संस्थानचे पुजारी आहेत.)

Web Title:  Bhajan, Kirtana happens through public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.