सिन्नरला प्रहारचे भजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:35 PM2021-07-16T16:35:45+5:302021-07-16T16:35:56+5:30

सिन्नर : शेतकऱ्यांची कर्ज, वीज वसुली थांबवण्यासाठी, सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी तसेच लॉकडाऊन उठविण्यासाठी प्रहार जनश्नती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.

Bhajan movement to attack Sinnar | सिन्नरला प्रहारचे भजन आंदोलन

सिन्नरला प्रहारचे भजन आंदोलन

Next

सिन्नर : शेतकऱ्यांची कर्ज, वीज वसुली थांबवण्यासाठी, सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी तसेच लॉकडाऊन उठविण्यासाठी प्रहार जनश्नती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.  सिन्नर व्यापारी, भैरवनाथ बँक व इतर पतसंस्थेच्या बेकायदेशीर कर्जाची चौकशी व्हावी, दिव्यांगांना अंत्योदय व निराधार योजनांचा लाभ विनात्रास मिळावा, शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळावी आदी मागण्यांचा विचार करून न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुका उपाध्यक्ष सुनील महाराज, संदीप लोंढे, दौलत धनगर, शिवाजी गुंजाळ, सुरेश सानप, संजय कदम, बापू सानप, गिता पानसरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Bhajan movement to attack Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक