भजन, अभंगांनी गजबजला नांदीनचा राम मंदिर परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 06:39 PM2020-08-06T18:39:29+5:302020-08-06T18:39:52+5:30
औंदाणे : अयोध्या येथील राममंदिर भूमीपूजन सोहळा निमित्ताने नांदीन (ता. बागलाण ) येथील राम मंदिर परिसर भजन, अभंगांनी गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
अयोध्येतील मंदिर भूमीपूजन सोहळ्यामुळे सडा, रांगोळ्या तसेच विद्युत रोषणाईने राममंदिर परिसर खुलला होता. गावात प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळ्या घालून दारासमोर गुढी उभारून भूमीपूजनाचे स्वागत करण्यात आले. सरपंच पुंडलीक शिंदे, उपसरपंच अनिल देवरे व ह.भ.प.भाऊसाहेब महाराज यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून भजनास सुरु वात केली. कोरोनाचा कहर पाहता सोशल डिस्टन्सिंग नियमाचा वापर करून सर्व मंदिर परिसर सॅनिटाईझ करण्यात आला. वर्षानुवर्षे रखडलेल्या मंदिर बांधकामाचे भूमिपूजन होत असल्याने गावातील सर्व ज्येष्ठ तरु ण मंडळीकडून राममंदिर भूमीपुजनाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब देवरे, सुनील शिंदे, शंकर देवरे, कारभारी देवरे,पोपट नेरकर, नामदेव महाराज, विनायक देवरे ,सोमनाथ देवरे, दीपक देवरे, उत्तम देवरे, सुभाष महाजन ,बापू शिंदे आदींसह भजनी मंडळ उपस्थित होते.