भाजयुमोची तीर्थ विकास बाईक रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 01:17 AM2022-06-13T01:17:14+5:302022-06-13T01:17:35+5:30
केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १२) तीर्थ विकास बाइक रॅली उत्साहात पार पडली.
नाशिक : केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १२) तीर्थ विकास बाइक रॅली उत्साहात पार पडली.
नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथील उड्डाणपुलावरून अनेक भाजयुमो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, बिटको पॉइंट, नांदूर गाव, तपोवन, के. के. वाघ कॉलेज उड्डाणपूलमार्गे नाशिक शहरात रॅली आणण्यात आली. त्यानंतर जुने नाशिक, अभिनव भारत मंदिर (तिळभांडेश्वर लेन), यशवंत व्यायामशाळा, सीबीएस, आकाशवाणी टॉवरमार्गे सातपूरकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर सातपूर बस स्टॅण्डमार्गे आयटीआय पूल, हेडगेवार अभ्यासिका त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, टेंभीनाका, महालक्ष्मीनगर, बुद्धविहार, अंबड गाव, महाजननगर, तीर्थ धाम, पाथर्डी फाटा, अश्विननगर, सेंट्रल पार्क या मार्गे रॅली निघून अंबड पोलीस स्टेशन येथे रॅलीचा समाराेप करण्यात आला. रॅलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह भाजयुमो अध्यक्ष अमित घुगे, युवती अध्यक्ष साक्षी दिंडोरकर, विजय बनछोडे, प्रशांत वाघ सहभागी झाले होते.