भालेकर मैदानावरील उत्सव अनिर्णित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:12 AM2018-08-17T01:12:35+5:302018-08-17T01:13:03+5:30

नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बोलविण्यात आलेल्या बैठकीत भालेकर मैदान येथे यंदा देखावे उभारता येईल किंवा नाही यावर निर्णय होऊ शकला नाही तर अन्य नियमावली विशेषत: मंडपाचे आकार, जाहिरात कर याबाबतही मंडळ कार्यकर्त्यांनी नकार दर्शविला. शक्य तेवढ्या नियमांचे पालन करा, असा मंडळांना तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला देत गुरुवारी (दि.१६) बोलविलेली ही बैठक संपविण्यात आली.

Bhalkar ground festival festive draw | भालेकर मैदानावरील उत्सव अनिर्णित

भालेकर मैदानावरील उत्सव अनिर्णित

Next
ठळक मुद्देमहापालिकेत बैठक : गणेश मंडळांना नियमावलीही अमान्य

नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बोलविण्यात आलेल्या बैठकीत भालेकर मैदान येथे यंदा देखावे उभारता येईल किंवा नाही यावर निर्णय होऊ शकला नाही तर अन्य नियमावली विशेषत: मंडपाचे आकार, जाहिरात कर याबाबतही मंडळ कार्यकर्त्यांनी नकार दर्शविला. शक्य तेवढ्या नियमांचे पालन करा, असा मंडळांना तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला देत गुरुवारी (दि.१६) बोलविलेली ही बैठक संपविण्यात आली.
महापौर रंजना भानसी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे ही बैठक राजीव गांधी भवनात बोलविली होती. आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मात्र बैठकीच्या प्रारंभीच कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना आधी महापालिकेची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. रस्त्यात मंडप उभारणे किंवा तसेच खड्डे खोदण्याचे नियम असून, त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.यंदा एक खिडकी योजनायंदा आॅफलाइन एक खिडकी योजना महापालिकेने केली असून, आॅनलाइन आणि आॅफलाइनदेखील उत्सव परवानगीचे अर्ज देता येतील असे सांगण्यात आले.

Web Title: Bhalkar ground festival festive draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.