यंदा होणार भाम धरणाची घळभरणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:02 PM2018-01-09T15:02:32+5:302018-01-09T15:05:51+5:30
सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा
नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणा-या इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळ भरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.
सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रूपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमीनीवर असलेले पीके, घर, गोठयांचेही मुल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादीत करण्यात आली. परंतु पुनवर्सनाच्या प्रश्नी काम धिम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पुर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनवर्सनासाठी धरणाच्या बाजुलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादीत करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून पुर्नवसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणा-या खर्चातही दरवर्षी वाढ होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भाम धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रूपये विशेष प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे एकूण ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले असून, ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरीत होतील असा अंदाज आहे.