येवला शिंपी समाज अध्यक्षपदी भांबारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:36+5:302021-07-31T04:14:36+5:30
येवला : येथील श्री संत नामदेव शिंपी समाज अध्यक्षपदी सुहास कृष्णदास भांबारे, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार दत्तात्रय लचके यांची ...
येवला : येथील श्री संत नामदेव शिंपी समाज अध्यक्षपदी सुहास कृष्णदास भांबारे, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार दत्तात्रय लचके यांची निवड करण्यात आली आहे.
समाजाचे अध्यक्ष अरविंद तुपसाखरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नामदेव विठ्ठल मंदिरात समाजाच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली. सदर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजाची तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष- सुहास कृष्णदास भांबारे, उपाध्यक्ष- नंदकुमार दत्तात्रय लचके, चिटणीस- प्रदीप लचके, सहचिटणीस- मयूर भुसे, सदस्य-रवींद्र हाबडे, सोमनाथ हाबडे, जयवंत खांबेकर, संतोष टिभे, प्रसाद खांबेकर, नीलेश माळवे, राहुल भांबारे, अमोल लचके, ज्ञानेश टिभे, रामा तुपसाखरे, दिनेश वारे, गणेश शिंदे, कैलास बकरे, राजेंद्र गणोरे, श्रीहरी भांबारे, स्वामी शिंदे, राजेंद्र कल्याणकर, राजेंद्र लचके, बळीराम शिंदे, मुकेश लचके, सागर मोतीवाले, राजेंद्र वारे, पुरुषोत्तम रहाणे आदींचा समावेश आहे. सभेस ज्येष्ठ समाजबांधव दत्तात्रय लचके, मधुसूदन शिंदे, अरविंद तुपसाखरे, जानकीराम शिंदे, अरुण पाथरकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- २९ सुहास भांबारे
२९ नंदकुमार लचके
290721\200429nsk_40_29072021_13.jpg~290721\200429nsk_41_29072021_13.jpg
फोटो- २९ सुहास भांबारे~फोटो- २९ सुहास भांबारे