भामेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:37 AM2017-10-23T00:37:33+5:302017-10-23T00:37:38+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भामेर शिवारात शनिवारी (दि. २१) संध्याकाळी एका चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून जंगलात नेल्याची घटना घडली. रात्रभर गावकरी सर्वत्र मुलाचा शोध घेत होते. सकाळच्या सुमारास परिसरातील एका जंगलात मुलाचे शिर आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
ताहराबाद वनक्षेत्रातील तळवाडे-भामेर परिसर हा जंगलांनी वेढलेला असून, या भागात मेंढपाळ नेहमी मुक्कामी असतात. एका मेंढपाळाच्या पडाव असलेल्या राहुटीमधून वडिलांजवळ झोपलेल्या कोमल नामदेव नामदास या अडीच वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून फरफटत जंगलात नेले. यानंतर गावातील नागरिकांनी रात्रभर सर्वत्र शोध घेतला; मात्र मुलगा आढळून आला नाही. दरम्यान, सकाळी काही लोक जंगलात शोधण्यासाठी गेले असता त्यांना मुलाचे शिर मिळून आले. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. या भागात तत्काळ पिंजरे लावण्यात येणार असून, मेंढपाळ कुटुंबीयांना शासकीय नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच दुसºया घटनेत संध्याकाळी सिन्नरजवळील मोहदरी घाटात नाशिक-पुणे महामार्गावर एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाºया बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे साडेतीन वर्षांचा नर जातीचा बिबट्या या अपघातात मृत पावला. यावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वनविभागाचे अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळ गाठले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, वनपाल अनिल साळवे, प्रितेश सरोदे, पोपट बिन्नर आदींनी स्पॉट पंचनामा केला. आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून वनविभागाच्या कर्मचाºयांनी मोहदरी वनोद्यानात मृत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निफाडला बिबट्या जेरबंद
निफाड तालुक्यातील शिवरे गावात धुमाकूळ घालणाºया बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शिवरे गावातील बाजीराव सानप यांच्या शेतात लावलेल्या पिंजºयात पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या अडकला. सदर माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, दत्तू अहेर आदींनी पिंजरा ताब्यात घेतला. सुरक्षितरीत्या पिंजरा निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आला.