आनंदपूर सोसायटी सभापतिपदी भामरे, आहिरे बिनविरोध
By admin | Published: July 17, 2016 01:16 AM2016-07-17T01:16:07+5:302016-07-17T01:16:22+5:30
आनंदपूर सोसायटी सभापतिपदी भामरे, आहिरे बिनविरोध
द्याने : बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी गंगाधर भामरे, तर उपसभापतिपदी तुकाराम आहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा सोसायटी कार्यालयात आयोजित करण्यात आली. सन २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी सदर संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली
असून, सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया घेण्यात आली.
निर्धारित वेळेत सभापती व उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज आल्याने गंगाधर भामरे व उपसभापतिपदासाठी तुकाराम आहिरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
डी.पी. आहिरे व चंद्रकांत आहिरे यांनी काम पाहिले. नूतन संचालक मंडळातील सदस्य प्रशांत आहिरे, अशोक भामरे, अरुण भामरे, रामदास आहिरे, नरेंद्र आहिरे, सतीश आहिरे, भिका पवार, महिला प्रतिनिधी विजया भामरे, मंगलबाई आहिरे उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात
आला. यावेळी नथा भामरे, उत्तमबाबा पवार, आत्माराम बाबा, शिवमन भामरे, जगन आहिरे, तात्याभाऊ भामरे, उपसरपंच बापू भामरे यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन अरुण भामरे
यांनी केले. आभार अशोक
भामरे, एस.के. खैरनार यांनी
मानले संस्थेचे सचिव बापू गवळी यांनी कामकाज पाहिले.
(वार्ताहर)