तळवाडे भामरेला शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:51 PM2018-08-27T16:51:12+5:302018-08-27T16:54:27+5:30

खरीप हंगामात शेतीसाठी भांडवल म्हणून त्यांनी अनेकदा बँकेत चकरा मारल्या होत्या. मात्र त्यांना कोणत्याही बँकेत कर्ज मिळू शकले नाही

 Bhamrella farmer suicides in Talwade | तळवाडे भामरेला शेतकऱ्याची आत्महत्या

तळवाडे भामरेला शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देपाऊस नसल्यामुळे खरीप पिकाचे होत्याचे नव्हते झाले असून तळवाडे सह परिसरात शेती व्यवसाय संकटात सापडला आहे

नामपूर : बागलाण तालुक्यातील तळवाडे येथील तरु ण शेतकरी नंदकुमार पोपटराव गायकवाड (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
शनिवारी (दि. २६) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाआहे. नंदकुमार गायकवाड हे शेती करीत होत. तीन भाऊ,वडील असा परिवार असलेले गायकवाड हे तीन एकर जमीन सर्व मिळून कसत होते. खरीप हंगामात शेतीसाठी भांडवल म्हणून त्यांनी अनेकदा बँकेत चकरा मारल्या होत्या. मात्र त्यांना कोणत्याही बँकेत कर्ज मिळू शकले नाही. शेतीत भांडवल लागत असल्यामुळे त्यांनी खाजगी व हातउचल कर्ज घेतले होते. यंदा कांद्याला भाव नाही. पाऊस नसल्यामुळे खरीप पिकाचे होत्याचे नव्हते झाले असून तळवाडे सह परिसरात शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. कौटुंबिक प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याची चर्चा आहे . गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची माहिती माजी सरपंच शामराव गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात व महसूल खात्याला दिली. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे .

Web Title:  Bhamrella farmer suicides in Talwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.