भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:04+5:302021-08-26T04:17:04+5:30
भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे ...म्हणे जमिनीतून सोने काढून देतो पाथर्डी फाटा भागातून मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ...
भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे
...म्हणे जमिनीतून सोने काढून देतो
पाथर्डी फाटा भागातून मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या होत्या. त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीदेखील झाली होती.
----
...म्हणे पैशांचा पाऊस पाडतो
जून महिन्यात सिडको भागात सार्वजनिक शौचालयाच्या वरच्या मजल्यावर एका भोंदूबाबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे लोकांना आमिष दाखवत दुकान थाटले होते. पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी बाबा येथून पसार झाला तो कायमचाच. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेला नग्न पूजेत बसण्यास भाग पाडून शारीरिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना मागील आठवड्यात गंगापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
----कोट----
भोंदूबाबांची संख्या शहरासह जिल्ह्यात वाढू लागली आहे. कायद्याची अंमलबजावणी सरकारकडून केली जावी. कायदा पारित केला गेला. मात्र, नियमावली अद्यापही तयार होऊ शकलेली नाही. एखाद्या भोंदूबाबाला गंभीर शिक्षा घडल्याचे अद्याप एकही उदाहरण जिल्ह्यात नाही. पोलिसांनीदेखील याबाबत गंभीरपणे पावले उचलण्याची गरज आहे.
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस