सैन्यातील मानसशास्त्रीय समस्यांवर ऊहापोह भोसला महाविद्यालय : आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:46 AM2018-01-06T01:46:59+5:302018-01-06T01:47:11+5:30

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे लेफ्टनंट जनरल डॉ़ डी़ बी़ शेकटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़५) उद्घाटन झाले़

Bhaosala College: Opening the International Conference on Psychological Issues | सैन्यातील मानसशास्त्रीय समस्यांवर ऊहापोह भोसला महाविद्यालय : आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

सैन्यातील मानसशास्त्रीय समस्यांवर ऊहापोह भोसला महाविद्यालय : आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Next

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला सैनिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे लेफ्टनंट जनरल डॉ़ डी़ बी़ शेकटकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़५) उद्घाटन झाले़ सैनिकी मानसशास्त्र, संकल्पना, आधुनिक विचारप्रवाह आणि भारतीय सशस्त्र दलांसाठी हितावह योजना या विषयावर या परिषदेत ऊहापोह होणार आहे़ प्राचार्य सूचिता कोचरगावकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महाविद्यालयात सैनिकी मानसशास्त्र हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल माइंड एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक जोसियाह डी. एम. यांग, सोसायटीचे सरकार्यवाह पी़ जी़ कुलकर्णी, कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, नाशिक विभागाचे सचिव डी़ जी़ बेलगावकर आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालकन मुग्धा जोशी यांनी, तर आभार शर्मिला भावसार यांनी केले़ सैन्यदलातील अत्यंत महत्त्वाचा असलेला मानवी घटक आणि त्या अनुषंगाने येणाºया मानसशास्त्रीय समस्या या प्रश्नांवर संरक्षण व मानसशास्त्र विषयांतील विविध तज्ज्ञांची मते मांडणार आहे़ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ डॉ़ नितीन करमाळकर यांनी या परिषदेसाठी पत्र पाठवून भारतीय संस्कृतीत असलेल्या पंचमहाभुतांचे सैनिकी मानसशास्त्रामध्ये असलेले उपयोजन स्पष्ट केले़

Web Title: Bhaosala College: Opening the International Conference on Psychological Issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.