महाराष्ट सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी भाबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:50 PM2020-01-04T23:50:54+5:302020-01-04T23:51:10+5:30
एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिन्नर : एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर, कळवण, बागलाण, मालेगाव, देवळा, त्र्यंबक, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या पंधरा तालुक्यात होणाऱ्या सरपंच संसदेच्या कार्याचे ते समन्वयक असतील अशी माहिती या संसदेचे महाराष्ट्र राज्याचे सहसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी दिली. निवडपत्र व ओळखपत्र वितरण तसेच महाराष्ट्र सरपंच संसदेच्या विद्यमाने पुढील वर्षात आयोजित करावयाच्या विविध उपक्र मांविषयी विचारविनिमय करण्यासाठी बुधवारी (दि. ८) एमआयटी पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बंडूनाना भाबड यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्ह्यातील सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र व ओळखपत्रांचे वितरण होणार आहे. सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या कार्यरत व्यक्तींचे नेटवर्क तयार करून त्यांच्या सहकार्याने हे ग्रामविकासाचे राज्यस्तरावरील महत्त्वपूर्ण अभियान यशस्वीरीत्या विस्तारित करण्याचे काम महाराष्ट्र सरपंच संसद करीत आहे.