भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:11 AM2018-04-06T01:11:24+5:302018-04-06T01:11:24+5:30

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली.

Bharat Bhamemanti: Welcome to the Artillery Center of Shaheed Swabhiman Yatra, 'Welcome to the nation's son, you are demanding Hindustan ...' | भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

Next
ठळक मुद्देतोफखाना दलाने या यात्रेचे जोरदार स्वागत केलेइंडिया गेटवर शहीद स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पाठिंबा दिला

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली. ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान’ हे ब्रीद घेऊन प्रवास करणाऱ्या यात्रेचे केंद्रातील वरिष्ठ अधिकाºयांनी स्वागत केले. यावेळी जवानांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. २९ राज्यांमधून ९९ दिवस १५ हजार किलोमीटरचा प्रवास करत भारतभ्रमंतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असलेल्या शहीद स्वाभिमान यात्रेचे बुधवारी (दि.४) रात्री नऊ वाजता तोफखाना केंद्रात आगमन झाले. भारतीय सैन्यदलातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तोफखाना दलाने या यात्रेचे जोरदार स्वागत केले. गुरुवारी (दि.५) सकाळी मेजर जनरल अशोक नरुला यांनी यात्रेला झेंडा दाखवत पुढील मार्गासाठी रवाना केले. यावेळी तोफखाना केंद्राचे जवान मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर उपस्थित होते. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणाºया शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने सर्वसामान्य १८ नागरिकांनी दिल्लीमध्ये एकत्र येत सुरेंद्रसिंह बिधुडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वाभिमान देश का’ या संघटनेची स्थापना के ली. २३ मार्च २०१८ रोजी भारतीय लष्करप्रमुख विपीन रावत यांनी दिल्ली येथील इंडिया गेटवर शहीद स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पाठिंबा दिला. ही यात्रा मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूरमार्गे नाशिकमध्ये पोहचली होती. सकाळी शहरातून यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यात्रेमध्ये सहभागी वाहनावर आकर्षक पद्धतीने शहीद भगतसिंग, शहीद चंद्रशेखर आझाद, शहीद राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्रे सजविण्यात आली आहेत.
साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण
२३ मार्च रोजी सुरू झालेली शहीद स्वाभिमान यात्रा दिल्लीहून राजस्थान राज्यात दाखल होऊन उदयपूरमार्गे गुजरात राज्यात ३१ मार्च रोजी पोहचली. अहमदाबाद येथून यात्रा उज्जैनमार्गे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेतून प्रवास नाशिकमध्ये दाखल झाली. यात्रेचा एकू ण साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण झाला आहे. यात्रा १० एप्रिल रोजी पुण्यात दाखल होणार आहे. यात्रेचा समारोप पंजाब राज्यातून मार्गक्रमणानंतर २४ जून रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवर होणार आहे.
असे आहे ‘मिशन’
शहीद स्वाभिमान यात्रेचे प्रमुख मिशन म्हणजे शहीद भगतसिंग यांना देशाचे राष्टÑपुत्र म्हणून सन्मान द्यावा. तसेच देशाच्या सर्व शहिदांना सर्वोच्च सन्मान द्यावा. शहीद भगतसिंग यांची मोठी प्रतिमा उभारण्याचे लक्ष्य. त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यामधून माती संकलित करणे. याबरोबरच शहीद संस्थांची स्थापना करण्याचा मानस. राष्टÑाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिक, अर्धसैनिक व पोलिसांना एकसमान स्वरूपात सन्मान द्यावा. त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमान सुविधांचा लाभ द्यावा. तसेच ‘शहीद स्वाभिमान कार्ड’ देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, अशा प्रमुख मागण्यांचे मिशन घेऊन यात्रा मार्गक्रमण करीत असल्याची माहिती यात्रेचे समन्वयक संतोष सिंह यांनी दिली.

Web Title: Bharat Bhamemanti: Welcome to the Artillery Center of Shaheed Swabhiman Yatra, 'Welcome to the nation's son, you are demanding Hindustan ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक