ताण-तणावावर प्रेमातूनच मात : भरत जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:43 PM2018-12-15T22:43:56+5:302018-12-16T00:24:09+5:30

प्रेम हे केवळ तरुण-तरुणींमध्येच असते व त्यासाठी गुलाबाचे फूल, महागडे भेटवस्तू दिल्यानंतरच व्यक्त होते असे नाही,तर आपल्या माणसांप्रती असलेली काळजी, आपुलकी व सतत पुढे जाण्यासाठी दिले जाणारे पाठबळ म्हणजेही एक प्रेमच असते़ सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ताण-तणाव असून, त्यावर हलक्या-फुलक्या प्रेमातूनच मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन अभिनेते भरत जाधव यांनी केले़ अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण लिखित ‘हलकं-फुलकं’ या प्रेमकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते़

Bharat Jadhav out of love for stress: stress | ताण-तणावावर प्रेमातूनच मात : भरत जाधव

‘हलकं-फु लकं’ या प्रेमकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव़ समवेत नंदू गवांदे, विजय जाधव, अ‍ॅड़ धर्मेद्र चव्हाण, अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जयराज नायर आदी़

Next
ठळक मुद्दे‘हलकं-फुलकं’ पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : प्रेम हे केवळ तरुण-तरुणींमध्येच असते व त्यासाठी गुलाबाचे फूल, महागडे भेटवस्तू दिल्यानंतरच व्यक्त होते असे नाही,तर आपल्या माणसांप्रती असलेली काळजी, आपुलकी व सतत पुढे जाण्यासाठी दिले जाणारे पाठबळ म्हणजेही एक प्रेमच असते़ सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ताण-तणाव असून, त्यावर हलक्या-फुलक्या प्रेमातूनच मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन अभिनेते भरत जाधव यांनी केले़ अ‍ॅड़ धर्मेंद्र चव्हाण लिखित ‘हलकं-फुलकं’ या प्रेमकथासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते़
शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात भरत जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़
नाट्य परिषदेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी कायद्याच्या तांत्रिक भाषेत वावरणाऱ्या चव्हाण यांनी लिहिलेल्या प्रेमकथा हा वेगळा विषय असल्याचे सांगितले़ यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ यावेळी अभिनेते जयराज नायर, किशोर यशोद, पुजांजी मालुंजकर आदींसह वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता़
जाधव म्हणाले की, सतत कायद्याच्या भाषेत बोलणाºया वकिलाने प्रेम या विषयावर कथा लिहिणे ही विशेष बाब आहे़ या पुस्तकात त्यानी महिलांवर कथा लिहिलेल्या असल्या तरी पुढील पुस्तकात त्यांनी महिलांना भावलेले पुरुषांवर कथा लिहाव्यात अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली़

Web Title: Bharat Jadhav out of love for stress: stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.