परिवर्तन केंद्राचे भरत कावळे यांचे निधन

By Admin | Published: April 18, 2017 09:03 PM2017-04-18T21:03:05+5:302017-04-18T21:03:05+5:30

पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन

Bharat Kawale of Transformation Center | परिवर्तन केंद्राचे भरत कावळे यांचे निधन

परिवर्तन केंद्राचे भरत कावळे यांचे निधन

googlenewsNext

नशिक : पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी राम मनोहर लोहियानगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
कावळे यांनी समाजवादी नेते राम मनोहर लोहीया यांच्या विचारातुन प्रेरणा घेऊन १९७७साली समाजसेवेला आरंभ केला. आणिबाणीच्या काळात कावळे यांना सत्याग्रहाचा मार्ग स्विकारल्याने तुरूंगवासही भोगावा लागला होता. ओझर येथील आदिवासी बांधवांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी लढा देत त्यांना हक्काचे घर मिळवुन दिले आणि त्यांच्या वसाहतीला राम मनोहर लोहीया नगर असे नाव दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे व त्यांना मुबलक पाणी मिळावे यासाठी वाघाड धरणावर प्रथमत पाणी वापर संस्था कावळे यांनी स्थापन केली.
कावळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कावळे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची हानी झाली आहे. कावळे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Bharat Kawale of Transformation Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.