भारत विद्यालय, मालेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:14+5:302021-02-20T04:40:14+5:30
---------------- के. बी. एच. विद्यालयात व्याख्यान मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने रमेश शिंदे यांचे ...
----------------
के. बी. एच. विद्यालयात व्याख्यान
मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने रमेश शिंदे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विलास पगार, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, पर्यवेक्षक निवृत्ती निकम, प्रवीण पाटील, संजीव महाले, प्रा. प्रफुल्ल निकम, कार्यालयीन प्रमुख जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार उपस्थित होते व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी आयर्न राजेंद्र देवरे, हितेश नितीन गोसावी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अथर्व निवृत्ती गायकवाड या विद्यार्थ्यांने पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पवार यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले, आभार प्रदर्शन राजेश धनवट यांनी केले.
-----------------------------------------
व्ही. बी. एच. विद्यालय, कळवाडी
मालेगाव : तालुक्यातील कळवाडी येथे व्हीबीएच विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के. व्ही. काकळीज होते. त्यांनी प्रतिमापूजन केले. उपमुख्याध्यापक एस. एच. बागुल, पर्यवेक्षक एस. एल. शिंदे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण, गीत व पोवाडे सादर केले. कनिष्ठ विद्यालयाचे प्रा. एस. पी. निकम व विजय शेवाळे यांची भाषणे झाली. प्राचार्य काकळीज यांनी मार्गदर्शन केले. उत्कृष्ट भाषण व गीत सादर करणारे विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन के. डी. वाकळे यांनी केले. आभार तुषार पारखे यांनी मानले.
----------------------------------------- ---------------
एज्युकेअर इंग्लिश मिडियम स्कूल, मालेगाव
मालेगाव : येथील एज्युकेअर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षिका सृष्टी पाटील, काजल पटेल, अर्चना खैरनार, रूपाली पवार, दुर्गेश्वरी दंडगव्हाळ, सादिया अहमद, शुभांगी पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अर्चना गायकवाड व स्नेहा परदेशी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा खैरनार यांनी केले.