भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृध्दा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 06:45 PM2020-06-10T18:45:03+5:302020-06-10T18:45:31+5:30
मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २५ ते ३० पोते संसारउपयोगी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक :अपघातात ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.७) रात्री द्वारका येथे घडली.
सावित्रीबाई पुंजा (७९, रा. मोठा राजवाडा, द्वारका) असे या अपघातातमृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री द्वारका येथील देवी मंदिरा समोर सावित्रीबाई या पायी जात असताना आलेल्या चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संजय शिरसाठी यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक डी. डी. इंगोले करत आहेत.
तडीपाराची पोलीसांना धक्काबुक्की
नाशिक : तडीपार असतानाही शहरात वावरणार्या सराईतास पकडण्यासाठी गेलेल्या पेलीसांना तडीपारासह त्याच्या साथीदाराने धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.९) सायंकाळी गंगावाडी भागात घडला.
जितेंद्र रविंद्र शेथे (२३, रा. सरदार पोलीस चौकीसमोर, पंचवटी) व अवधुत सुनिल जाधव (१९, रा. दत्तमंदिर, शिवशक्तीचौक, नवीन नाशिक) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन नेटारे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जितेंद्र शेटे यास तडीपार केलेले असतानाही तो शहरात फिरत असल्याची माहिती होती. त्यानुसार नेटारे व त्यांचे सहकारी त्यास पकडण्यासाठी गेले असताना त्यास ताब्यात घेताना शेटे व जधव यांनी नेटारे यांना धक्काबुक्की केली. तसेच दोघांकडे धारदार चाकू आढळून आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात आडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक चौधरी करत आहेत.
महात्मानगरला घरफोडी
नाशिक : कुटुुबिय घरी नसल्याचा फायदा उचलत घरफोडी करून चोरट्यांनी संसारउपयोगी साहित्य चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.
किर्तीकुमार उत्तमलाल पांचाळ (पुर्ण नाव पत्ता नाही) व त्याचे साथीदार असे संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी गौतम कांतिलाल हिरण (५२, रा. अशोकामार्ग, टागोरनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे माहत्मानगर येथील जिऑन एलेजा अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी सोमवारी रात्री पांचाळ व त्याच्या सकाहर्यांनी खिडकीचा दरवाजा वाकवून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २५ ते ३० पोते संसारउपयोगी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक वैसाणे करत आहेत.