भरधाव कारने दुचाकीस्वाराला दोन किमीपर्यंत फरफटत नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:28+5:302021-02-09T04:16:28+5:30
मखमलाबाद गावापासून तर थेट दुगावमार्गे गिरणारेपर्यंतचा रस्ता जीवघेणा ठरत आहे. हा रस्ता सुरक्षित करण्याची मागणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून होत आहे. ...
मखमलाबाद गावापासून तर थेट दुगावमार्गे गिरणारेपर्यंतचा रस्ता जीवघेणा ठरत आहे. हा रस्ता सुरक्षित करण्याची मागणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून होत आहे. गिरणारेकडून मखमलाबादच्या दिशेने भरधाव फॉक्सवॅगन कार (एम.एच १५ जी आर ४५००) दामटविणारा संशयित चालक सौमित्र विवेक कुलकर्णी (२२,रा.माणिकनगर, गुरुदेव पार्क, गंगापूर रोड) याने स्वत:च्या ताब्यातील वाहनावर कुठलेही नियंत्रण न ठेवता भरधाव वाहन चालवून आपल्या वाहनापुढे मार्गस्थ होत असलेल्या यामाहा दुचाकीला (बीएल ७ एसएच ७१४३) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक नीलेश उर्फ बाळू गायकवाड (२१, रा.यशवंतनगर) याचा मृत्यू झाला, तर त्यासोबत दुचाकीवर पाठीमागे बसलेले करण कैलास जाधव हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. फिर्यादी कांचन गायकवाड (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
---इन्फो--
...तर तीव्र आंदोलन करणार
रस्ता रुंद झाल्यापासून वाहतुकीला मोठा वेग आला आहे. या रस्त्यावर विविध चौफुली, त्रिफुली, पाट, चारीचे बांध आहेत. रस्त्यावर कोठेही वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे सूचनाफलक, रिफ्लेक्टर, अपघातप्रवण स्थळांविषयीचे फलक नजरेस पडत नाहीत. यामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होताना स्थानिक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागते. जिल्हा वाहतूक शाखा व तालुका पोलिसांसह आरटीओच्या भरारी पथकांनी या मार्गावर वेळोवेळी नाकाबंदी करून वेगमर्यादेसह अन्य वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे.
---इन्फो--
वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली
या रस्त्यावर विविध चौफुली, त्रिफुली, पाट, चारीचे बांध आहेत. रस्त्यावर कोठेही वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे सूचनाफलक, रिफ्लेक्टर, अपघातप्रवण स्थळांविषयीची फलके नजरेस पडत नाही. यामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होताना, स्थानिक दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागते. जिल्हा वाहतूक शाखा व तालुका पोलिसांसह आरटीओच्या भरारी पथकांनी या मार्गावर वेळोवेळी नाकाबंदी करून वेगमर्यादेसह अन्य वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे.
--इन्फो--
खुलेआम मद्यविक्रीवर हवे नियंत्रण
या रस्त्यावर विविध ठिकाणी लहान-मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरु झाले आहे. यामधून सर्रासपणे खुलेआम मद्यविक्री होत असल्याने शहरी भागातून येथे येणाऱ्या मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही वाहनचालक तर वाहने चालविताना एका हातात चारचाकीचे स्टेअरिंग तर दुसऱ्या हातात मद्याची बाटली घेत रात्री, तसेच भरदिवसाही मार्गस्थ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधत जनजागृतीचा आव आणला जात आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात ज्या मूळ कारणांमुळे अपघात घडतात, त्याकडे लक्ष देण्यास शासकिय यंत्रणा तयार नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
---
फोटो आर वर ०८ॲक्सिडेंट/१
===Photopath===
080221\08nsk_6_08022021_13.jpg
===Caption===
रस्ते अपघातात वाहनांचे नुकसान