भारिप बहुजन महासंघाचे ‘दे धक्का’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:32 AM2018-05-30T00:32:07+5:302018-05-30T00:32:31+5:30
नाशिक : देशपातळीवर इंधनाची दररोज होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकीची अंत्ययात्रा काढून ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सकाळी शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी एका चारचाकी हातगाडीवर दुचाकी ठेवून तिची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘बहोत हुई मन की बात, अब की बार घर बैठो बीजेपी सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानक चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, दररोजच्या इंधन दरवाढीमुळे महागाईत वाढ हाते असून, सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाºया बीजेपी सरकारने नोटबंदी, शेतकºयांची फसवी कर्जमाफी, शेतमालाचा पडलेला भाव अशा सर्वच पातळीवर नागरिकांचा विश्वासघात केला आहे. सरकारने लवकरात लवकर महागाई आटोक्यात आणावी, इंधनाचे दर कमी करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात भारिपचे जिल्हाध्यक्ष वामन गायकवाड, अरविंद जगताप, विनय कटारे, ताराचंद मोतमल, बाबा केदारे, स्वराज नंद, अजय काळे, मारुती घोडेराव, गौतम बागुल, डॉ. अनिल सोनवणे, समाधान चव्हाणे, गणेश शिरसाठ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.