‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:38 PM2024-03-05T13:38:11+5:302024-03-05T13:39:32+5:30
या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे.
नाशिक : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासाचा गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा असलेल्या भरवीर ते इगतपुरी या २५ किलोमीटरचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार हिरामण खोसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे.
महामार्गावर १८ कृषी समृद्धी केंद्रे करणार
समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी डेव्हलपमेंट हब तयार करण्यात येणार आहे. यामध्ये इंडस्ट्रीयल हब, शेतकऱ्यांसाठी १८ कृषी समृद्धी केंद्रे तथा कृषी हब तयार करण्यात येणार आहेत. महामार्गामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
मुंबईची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून, भिवंडी येथे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा बंदोबस्त करा, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.