खेडगाव पोटनिवडणुकीत भास्कर भगरे यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:38 PM2019-12-13T12:38:41+5:302019-12-13T12:38:50+5:30
दिंडोरी : जिल्हा परिषद खेडगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व दिंडोरी तालुका विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार भास्कर भगरे ६८९५ मतांनी विजयी झाले.
दिंडोरी : जिल्हा परिषद खेडगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व दिंडोरी तालुका विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार भास्कर भगरे ६८९५ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार विजय वाघ यांना पराभूत केले. भगरे यांना ११०४१ तर विजय वाघ यांना ४१४६ मते मिळाली. नोटाची १३४ मते मिळाली. गोंडेगाव येथील रहिवासी असलेल्या भगरे यांचा गरीब शेतकरी कुटूंबात जन्म झाला असून त्यांनी यापूर्वी पंचायत समितीचे सभापती म्हणून कामकाज पाहिले आहे. खेडगाव गटासाठी गुरूवारी ४५ टक्के इतकेच मतदान झाले होते. खेडगाव गटाची मतमोजणी सहा टेबलांवर पूर्ण झाली. खेडगाव गटातून धनराज महाले यांनी विधानसभा निवडणूक लढविल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथील रिक्त जागेसाठी निवडणूक झाली होती.