भाच्यानेच केली साडेसतरा लाखांची फसवणूक ; आत्येकडूनउसणवार घेतलेले पैस परत न करा धमकावण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 05:40 PM2019-03-17T17:40:23+5:302019-03-17T17:44:27+5:30

तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Bhatnacharya deceived seven and a half lakhs; The type of intimidation not to repay the money taken from the house | भाच्यानेच केली साडेसतरा लाखांची फसवणूक ; आत्येकडूनउसणवार घेतलेले पैस परत न करा धमकावण्याचा प्रकार

भाच्यानेच केली साडेसतरा लाखांची फसवणूक ; आत्येकडूनउसणवार घेतलेले पैस परत न करा धमकावण्याचा प्रकार

Next
ठळक मुद्देव्यावसायासाठी घेतलेले उसने पैसे परत करण्यास नाकारटूर्स ट्रव्हल्सच्या व्यावसायासाठी घेतले होते पैसे व दागिने भाच्याने केली आत्याची फसवणूक

नाशिक : तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधाते मळ्यातील मनीषा हेमंत विधाते (५०) यांनी नाशिकरोडच्या सामनगावरोड परिसरातील संशयित आरोपी प्रशांत सदानंद गाडेकर याला स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये व सात लाख ५० हजार रुपयांचे दागिने दिले होते. या प्रकरणातील आरोपी फिर्यादीच्या भावाचा मुलगा असून, त्यांनी फिर्यादी मनीषा विधाते यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याक डून १ नोव्हेंबर २०१३ पासून ते १ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही रक्कम व सोन्याचे दागिने मिळविले होते. परंतु, आरोपीने व्यवसायासाठी घेतलेली रक्कम व दागिने परत न करता आपल्या आत्याची फसवणूक केली. त्यामुळे मनीषा विधाते यांनी त्यांचा भाचा प्रशांत गाडेकर याच्या विरोधात दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. यू. शिंदे या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहे. 

Web Title: Bhatnacharya deceived seven and a half lakhs; The type of intimidation not to repay the money taken from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.