भाऊसाहेब कचरे टीडीएफचे अधिकृत उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:20 AM2018-06-05T01:20:56+5:302018-06-05T01:20:56+5:30
लोकशाही शिक्षक आघाडीच्या अध्यक्षांच्या मृत्यनंतरचे संघटनात्मक अधिकार घटनेनुसार कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे आले आहेत. टीडीएफची उमेदवारी भाऊसाहेब कचरे यांना जाहीर
नाशिकरोड : लोकशाही शिक्षक आघाडीच्या अध्यक्षांच्या मृत्यनंतरचे संघटनात्मक अधिकार घटनेनुसार कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे आले आहेत. टीडीएफची उमेदवारी भाऊसाहेब कचरे यांना जाहीर केली असल्याने तेच टीडीएफचे अधिकृत उमेदवार आहेत, असे प्रतिपादन टीडीएफ संघटनेचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी केले. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोटवाणी रोडवरील पाटीदार भवन येथे टीडीएफ संघटनेचा मेळावा झाला. यावेळी बादशाह म्हणाले की, शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा. गेल्या ६ वषार्त शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला नाही तर काय होते हे सगळ्या शिक्षकांनी अनुभवले आहे. त्यामुळे पुन्हा ही चूक करू नका, झालेली चूक सुधारण्यासाठी कचरे यांच्यामुळे संधी निमार्ण झाली असून, कचरे टीडीएफचे अधिकृत उमदेवार असल्याने बादशाह यांनी सांगितले. यावेळी के. एन. अहिरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकरराव जोर्वेकर, श्याम पठारे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, बाळासाहेब सूर्र्यंशी, एस.के.सावंत, सुरेश शेलार, रईस अहमद, कचेश्वर बारसे आदी शिक्षक नेते उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी निगरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश
देवरे व आभार पी. जे. देवरे यांनी मानले. यावेळी पाचही जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.