‘भावली’ तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:06 AM2017-07-22T01:06:56+5:302017-07-22T01:07:25+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहतअसून, तालुक्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : इगतपुरी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत
असून, तालुक्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. या धरणासह त्रिंगलवाडी धरण, भाम व खापरी नदीचे पाणी दारणा नदीतून मोठ्या प्रमाणात दारणा धरणात येत असल्याने धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपून काढले आहे. या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाले
दुथडी भरून वाहत असून, दारणा नदीच्या उगमस्थानी असणाऱ्या भावली धरण परिसरात विक्रमी
पाऊस झाल्याने दारणा धरण समूहातील अडीच टीएमसी क्षमतेचे भावली धरण पूर्ण भरले आहे.
दारणा धरणातही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या ते ८१.५८ टक्के भरले आहे.
तालुक्यातील घोटी येथे १३१ मिलिमीटर, तर घोटी येथे १४३ मिलिमीटर इतकी विक्र मी पावसाची नोंद झाली असून, तालुक्यात आतापर्यंत २०३० मिलिमीटर नोंद झाली आहे.