अर्धनग्न आंदेालन करणाऱ्या भावे यांना पोलिसांची समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:18+5:302021-05-27T04:15:18+5:30

कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अनामत म्हणून दीड लाख रुपयांची रक्कम वोक्हार्ट हॉस्पिटलने घेतली होती. रुग्णालयाचे सर्व बिल भरल्यानंतरदेखील दीड ...

Bhave, who was protesting half-naked, understood the police | अर्धनग्न आंदेालन करणाऱ्या भावे यांना पोलिसांची समज

अर्धनग्न आंदेालन करणाऱ्या भावे यांना पोलिसांची समज

Next

कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी अनामत म्हणून दीड लाख रुपयांची रक्कम वोक्हार्ट हॉस्पिटलने घेतली होती. रुग्णालयाचे सर्व बिल भरल्यानंतरदेखील दीड लाख रुपयांची अनामत रक्कम अमोल जाधव यास देण्यास टाळाटाळ केली जात हेाती, अशी जाधव यांची तक्रार होती. त्यामुळे मंगळवारी भावे आणि जाधव यांनी मंगळवारी (दि. २५) हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न होत आंदोलन केले.

भावे यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनप्रश्नी पोलिसांनी त्यांना कडक समज देत यापुढे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात येऊन कल्पना देत पोलीस मदत घेऊन मगच जावे, अशी समज दिली आहे. कुठल्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी असभ्य स्वरूपाचे वर्तन करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील, असे कृत्य न करण्याची समज दिली आहे.

इन्फो...

पाेलिसांकडून दडपशाही; शिंदे यांचा आरोप

नाशिक : शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची कोरोनाच्या उपचारादरम्यान कार्पोरेट रुग्णालयांकडून वैद्यकीय खर्चाच्या नावाखाली लूट होत आहे. मात्र असे प्रकार उघड करण्यासाठी अर्धनग्न होत गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावे यांच्यावर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी बुधवारी (दि.२६) शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. भावे यांनी गांधीगिरीचा अवलंब करत सर्वसामान्य गरीब युवकाच्या न्यायहक्कासाठी आंदोलन केले तर काय चुकले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी जितेंद्र भावे, विनायक येवले, नितीन शुक्ल, कुंतल कापडणीस हे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bhave, who was protesting half-naked, understood the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.