‘भाविसे’ने कर्नाटका बॅँक व्यवस्थापकांना दिली ‘जय महाराष्ट्र फ्रेम ’ भेट

By admin | Published: May 23, 2017 07:16 PM2017-05-23T19:16:07+5:302017-05-23T19:16:07+5:30

कर्नाटकच्या नगरविकास मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून नाशिकमधील भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅ नडा कॉर्नरवरील कर्नाटक बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना ‘महाराष्ट्र फ्रेम’ भेट

'Bhavis' handed over the 'Jai Maharashtra frame' to Karnataka's Bank Managers | ‘भाविसे’ने कर्नाटका बॅँक व्यवस्थापकांना दिली ‘जय महाराष्ट्र फ्रेम ’ भेट

‘भाविसे’ने कर्नाटका बॅँक व्यवस्थापकांना दिली ‘जय महाराष्ट्र फ्रेम ’ भेट

Next

नाशिक : कर्नाटकच्या नगरविकास मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून नाशिकमधील भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅ नडा कॉर्नरवरील कर्नाटक बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना ‘महाराष्ट्र फ्रेम’ भेट दिली. कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री यांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विधानसभा सदस्यांनी ‘महराष्ट्र’विषयी प्रेम व्यक्त केले किंवा ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा जरी दिल्या तरी सदस्यांचे पद रद्द केले जाईल, असा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे. यामुळे मराठी भाषिकांची पुन्हा गळचेपी होत असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने बॅँकेच्या प्रवेशद्वारावर भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या. तसेच महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये व्यवसाय कराल तर ‘जय महाराष्ट्र’ बोलावेच लागेल आणि महराष्ट्राविषयीचे प्रेम मनात बाळगावे, लागेल असा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख योगेश बेलदार, महानगरप्रमुख संदीप गायकर, उपमहानगरप्रमुख राजाभाऊ क्षिरसागर, गणेश पाटील आदि उपस्थित होते.

Web Title: 'Bhavis' handed over the 'Jai Maharashtra frame' to Karnataka's Bank Managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.