माणिकखांब येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिमा चव्हाण बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:28 PM2019-08-08T19:28:50+5:302019-08-08T19:29:17+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणकिखांब येथे ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भैरवनाथ प्रसन्न विकास पॅनलच्या भिमाबाई रतन चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Bhima Chavan is unopposed as Deputy Panchayat of the Gram Panchayat at Manikkhamb | माणिकखांब येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिमा चव्हाण बिनविरोध

माणकिखांब येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या नविनर्वाचित उपसरपंच भिमाबाई चव्हाण यांचा सत्कार करतांना ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देमाणकिखांब ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणकिखांब येथे ग्रामपंचायतीच्या झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भैरवनाथ प्रसन्न विकास पॅनलच्या भिमाबाई रतन चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भिमाबाई रतन चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्पष्ट बहुमत असल्यामुळे याआधी थेट सरपंचपदी अंजना गोविंद चव्हाण यांची निवड झाली आहे. यावेळीस ग्रामपंचायत सदस्य वर्षा म्हसणे, विनता चव्हाण, ललिता भटाटे, शाम चव्हाण, अशोक पगारे आदी उपस्थित होते. नविनर्वाचीत उपसरपंच भिमाबाई चव्हाण, सरपंच अंजना चव्हाण व सर्व नविनर्वाचित सदस्यांचा यावेळी माणकिखांब ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनसेचे उपतालुकाप्रमुख अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख भारत भटाटे माजी उपसभापती विष्णू चव्हाण, शिवसेनेचे नेते प्रल्हाद भटाटे, नारायण आडोळे माजी सरपंच लालु आडोळे युवानेते संजय भटाटे, सदानंद आडोळे, गोकुळ आडोळे, ज्ञानेश्वर चव्हाण, किशोर चव्हाण, उपतालुका अध्यक्ष पिंटू चव्हाण माजी सरपंच रतन चव्हाण, प्रविण पगारे बाळू भाऊ चव्हाण, सुनील पगारे, माजी सरपंच देवकी चव्हाण, स्कूल कमेटी अध्यक्ष काळु चव्हाण सामाजिक कार्यकर्ते मधुकर चव्हाण माणलिाल आडोळे बंटी पगार, सामाजिक कार्यकर्ते राजु चव्हाण, काशिनाथ ठमके, बंटी पगारे जेष्ठ नेते कृष्ण हंबीर, रवी चव्हाण, संतोष चव्हाण, आशोक चव्हाण, रामचंद्र चव्हाण सामाजिक कार्यकर्ते तुकाराम चव्हाण, मनोहर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंत चव्हाण, राणू चव्हाण सामाजिक कार्यकर्ते रतन भटाटे, भगवान भटाटे, विजय जोशी, भुषण भटाटे, भाऊराज लायरे, श्रावण भटाटे, गणपत चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, रमेश चव्हाण, पांडुरंग भटाटे, आकाश, ठमके, सचिन ठमके, ज्ञानेश्वर चव्हाण, योगेश चव्हाण, दिपक चव्हाण, बाळु भोईर किसन चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Web Title: Bhima Chavan is unopposed as Deputy Panchayat of the Gram Panchayat at Manikkhamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.