भीमानं माय सोन्यानं भरली ओटी... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:55 PM2020-04-15T22:55:12+5:302020-04-15T22:57:48+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथवाचन, सोशल मीडियावरून विविध स्पर्धांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणीही करण्यात आली. कोरोनामुळे यंदा पारंपरिक मिरवणुका व भीमगीतांच्या मैफलींचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.

Bhimana my gold filled ot ...! | भीमानं माय सोन्यानं भरली ओटी... !

मालेगाव येथील पवार कुटुंबीयांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जयश्री पवार, प्राजक्ता पवार व आनंद पवार यांनी जात्यावरील ओव्या गात बाबासाहेबांना अभिवादन केले.

Next
ठळक मुद्देघरातूनच अभिवादन : सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिमापूजन; निळ्या झेंड्यांनी सजले रस्ते

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या महामारीने देशाला ग्रासले असल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आंबेडकरी अनुयायांनी घरात राहूनच जयंती उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी बुद्धवंदना, ग्रंथवाचन, सोशल मीडियावरून विविध स्पर्धांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणीही करण्यात आली. कोरोनामुळे यंदा पारंपरिक मिरवणुका व भीमगीतांच्या मैफलींचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली.

थ्री डी रांगोळीतून बहुमूल्य संदेश

चांदवड : भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा महासागर, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाची भीमजयंती घरी विविध पुस्तके वाचून साजरी करूया. या उद्देशाने ही थ्रीडी रांगोळी बारा तासाच्या परिश्रमाने साकारलेली आहे. सध्या भारतावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट उभे आहे. संपूर्ण भारत लॉकडाउन स्थितीमध्ये आहे. शासनाला सहकार्य करून यंदाची भीमजयंती प्रत्येकाने घरीच विविध पुस्तके वाचून साजरी केली तर खºया अर्थाने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याचं सार्थक होईल. वाचाल तर वाचाल तसेच पुतळ्यात नको, मला पुस्तकात शोधा असा बाबासाहेबांचा बहुमूल्य संदेश या थ्री डी रांगोळीतून चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी दिला आहे.

साताळी येथे बाबासाहेबांना अभिवादन
येवला : तालुक्यातील साताळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच शहाजीराजे काळे, दीपक कोकाटे, अमोल सोनवणे, वसंत मोरे आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले.

झोडगे रु ग्णालयात महामानवास अभिवादन
कळवाडी : झोडगे येथील ग्रामीण रु ग्णालयात कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेत कार्यरत असणाºया अधिकारी व कर्मचारी वर्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मसूद यांच्या हस्ते करण्यात प्रतिमापूजन आले. यावेळी क्ष-किरण वैज्ञानिक शिवाजी शिरसाठ, प्रयोगशाळा वैज्ञानिक चौधरी, परिचारिका बादशहा आदी उपस्थित होते.

धामोडा येथे महामानवास अभिवादन
येवला : तालुक्यातील धामोडे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करण्यात आली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने भीमसैनिकांना घरात जयंती साजरी करावी लागली आहे. बाबासाहेबांनीच सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज कोरोनाशी संघर्ष करायचाय. त्यासाठी संघटित होऊया. सरकार, प्रशासन यांना मदत करूया आणि सर्वांनी घरातच थांबूया, कोरोनाला हरवूया, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली खरी आदरांजली होऊ शकेल, असा संदेश यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांनी दिला.

मेहतर समाज संस्थेतर्फे धान्य, किराणा वाटप
येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने येथील महर्षी नवलस्वामी वाल्मीकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबांना धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन सोनवणे, संस्था अध्यक्ष विकी बिवाल यांच्या हस्ते शहरातील लक्कडकोट भागातील २० गरजू कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो गहू व सुमारे अकराशे रुपये किमतीचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी कुंदन बिवाल, पल्लूराम धारू, संतोष बेलदार, बापू लाड, चंद्रकांत खलसे आदी उपस्थित होते.

पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये प्रतिमेला पुष्पहार अर्पण
पाटोदा : कोरोना विषाणू प्रादुभार्वाच्या पाशर््वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखत ठाणगाव, पाटोदा परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. ठाणगाव, पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. तर घरांवर निळा ध्वज फडकवून दारासमोर रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.

निंबोळा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन
देवळा : तालुक्यातील निंबोळा ग्रामपंचायत व बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोशल डिस्टन्स ठेवत साजरी झाली. सरपंच प्रदीप निकम, उपसरपंच सुशीला तलवारे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक सुदर्शन बच्छाव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायततर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. संतोष सोनवणे, मधुकर अहिरे, विनोद गरु ड, रवी गरु ड, अरु ण सावंत, गोरख देवरे, संजय निकम, विठ्ठल देवरे यांनी संयोजन केले.

नांदूरवैद्य परिसर
नांदूरवैद्य : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी घरातच राहून साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक आदी ठिकाणी साजरी करण्यात आली. घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर महामार्गावरील गस्त घालणारे अधिकारी रवि देहाडे व सहकार्यांनी कार्यालयात आंबेडकर यांची जयंती साजरी करत अभिवादन केले.
 

क्र ांतिगुरु सोशल फाउण्डेशनतर्फेपुस्तकवाचन
सिन्नर : क्रांतिगुरु सोशल फाउण्डेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकांचे वितरण करून घरातच वाचन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे यांच्या निवासस्थानी प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून घरीच जयंती साजरी करण्याचे क्रांतिगुरु च्या वतीने ठरविण्यात आले होते. यावेळी कांबळे यांच्या संग्रहातील अण्णा भाऊ साठे साहित्य संपदेतील पुस्तके वाटप करून वाचन करण्याचा संकल्प करण्यात आला. फकिरा, वैजयंता, माझा रशियाचा प्रवास, आवडी, संघर्ष, वारणेचा वाघ, स्मशानातील सोनं, रानबोका, बरबाद्या कंजारी अशा विविध पुस्तकांचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक अंतर राखत मास्कचा वापर करण्यात आला. फाउण्डेशनचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके, संचालिका चित्रा कांबळे, सिन्नर युवा तालुकाध्यक्ष योगेश जाधव, युवा उपाध्यक्ष रवि कांबळे, संकल्प कांबळे, सिद्धी कांबळे उपस्थित होते.

इगतपुरीत टोप्या वाटप करून अन्नदान
इगतपुरी : शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने व घरात साजरी करण्यात आली. प्रशासन, जनसेवा प्रतिष्ठान व पॉइंट सोशल फ्रेण्ड ग्रुपच्या वतीने वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांना मोफत टोप्या वाटप करून शहरातील गोरगरीबांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, महिला पोलीस सहा. निरीक्षक मांढरे आदींनी सोशल अंतर ठेवून कार्यक्र म पार पाडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात व तालुक्यात अत्यंत साध्या पद्धतीने घरातच जयंती साजरी केली असल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे अध्यक्ष किरण फलटणकर, अजित पारख, शांतिलाल चांडक, दीपक राठी, कृष्णा परदेशी, सुनील आहेर, प्रकाश नांवदर, विजय गुप्ता, सागर परदेशी, सचिन बाफना, दिनेश लुणावत, शैलेश शर्मा, पवन छाजेड, प्रथमेश पुरोहित, मदन परदेशी, योगेश गुप्ता, मयंक रावत, रामदयाल वर्मा, विनोद व्यास, राजेश जैन, रोहन जगताप, योगेश भडांगे तर पॉंइंट सोशल ग्रुपचे किरण अहिरे, सिंध्दात साबळे, विशाल पवार, प्रसाद ढवसे, मयूर मिरगुंडे, सुहास बर्वे, अभिजित अहिरे, नंदू उबाळे, सिध्दार्थ शिंदे, मयूर दोंदे, दीपक दुबे आदी उपस्थित होते.

अभोणा येथे बुद्धवंदना
अभोणा : येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात साजरी करण्यात आली. लॉकडाउन असल्याने कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्र म न घेता भीम अनुयायांनी आपल्या कुटुंबीयासमवेत बुध्दवंदना, ग्रंथवाचन व प्रतिमापूजन करत बाबासाहेबांना अभिवादन केले.

देवळा येथे ग्रंथ वाचनाचा उपक्रम
देवळा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करण्यात आली. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देवळा तालुक्यात प्रतिमा पूजन व ग्रंथ वाचनाचा उपक्रम पार पडला. 

Web Title: Bhimana my gold filled ot ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.