मुक्तिभूमीवर भीमसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:53 AM2017-10-14T00:53:42+5:302017-10-14T00:53:47+5:30
शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८२वा वर्धापन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करीत मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्र म आयोजित केले. राज्यभरातून आलेले लाखो समाजबांधव येथे हजेरी लावून नतमस्तक झाले.
येवला : शहरातील मुक्तिभूमी येथे लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावीत बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८२वा वर्धापन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करीत मुक्तिभूमी येथे विविध कार्यक्र म आयोजित केले. राज्यभरातून आलेले लाखो समाजबांधव येथे हजेरी लावून नतमस्तक झाले. मुक्तिभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळला. महामानवाला भीमसैनिकांनी अभिवादन केले. डॉ. आंबेडकर स्मारकात सकाळपासूनच दर्शनासाठी बौद्ध बांधव, महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी दर्शन घेतले. निळा ध्वज हातात घेऊन जयभीमचा जयघोष करीत हजारो बांधव मुक्तिभूमीकडे दाखल झाले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता राष्ट्रीय प्रवक्ते भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भिक्खू संघाच्या वतीने मुक्तिभुमी ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संपूर्ण शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत श्रामनेर भिक्खू संघासह बौद्ध बांधव सहभागी झाले होते. मुक्तिभूमी येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील आंबेडकरी संघटनांसह रिपाइंच्या वतीने भोजनदान, चहा-पाणी, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. भीमगर्जना मित्रमंडळाच्या वतीने चहा- पाणी व्यवस्था करण्यात आली. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एन. एम. आगाणे, वसंतराव पराड, वि. म. रूपवते, संजय खंडीझोड, भगवान साबळे, अनिकराव गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुक्तिभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे स्टॉल्स, विविध वस्तू विविध प्रकारच्या मूर्तींसह विविध वस्तूंची दुकाने लावण्यात आली होती.
सकाळपासूनच येवला विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाऊले चालती मुक्तीभूमीची वाट म्हणत लाखो दलित बांधव मुक्तीभूमीवर नतमस्तक झाले. संभाजीराजे पवार, अॅड.माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, डॉ,दिलीप मेनकर, नरेशकुमार बहिरम, डॉ.राहुल खाडे, बाळासाहेब लोखंडे,दिपक लोणारी, रिपांईचे गुड्डु जावळे, राजेंद्र लोणारी, सुभाष गांगुर्डे,सुनील पैठणकर, धनंजय कुलकर्णी,महेश आहेर यांनी पुष्पहार अर्पण केला.
प्रा. शरद शेजवळ यांच्यासह प्रतिष्ठानच्या कलाकारांनी क्र ांतीगिते सादर करून बाबासाहेबांची महती जनतेसमोर सादर केली. भारतीय बौध्द महासभेच्यावतीने शहरातील मुक्तिभूमी ते विंचुर चौफुली पर्यंत रॅली काढण्यात आली. ज्या मैदानावर बाबासाहेबांनी धर्मातंराची घोषणा केली त्या मुक्तिभूमी येथील मैदानावर ध्वजारोहण व क्र ांतीस्तंभाला आंबेडकरी जनतेसह अनेकांनी पुष्पहार अर्पण केला. ब्लू पंथर चे संस्थापक सुभाष गांगुर्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोफत सरबताचे याशिवाय अनेकांनी अन्नदानासाठी परिसरात राहुट्या उभ्या केल्या होत्या. पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, शहर पो.नी. संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक रु पचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे मुक्तिभूमीला छावणी चे स्वरूप आले होते.