भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूर पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:47 PM2018-08-26T17:47:15+5:302018-08-26T17:48:15+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.
पश्चिम पट्टयात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने म्हांळुगी नदीला पूर आला होता. म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात १६ आॅगस्ट पासून पाणी येण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे ३६० क्षमतेचे भोजापूर धरण गुरूवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी उशिरा धरण भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर पाणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आंनद व्यक्त केला जात आहे.
या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून तालुक्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळी परिस्थिती असतो त्यामूळे भोजापूर धरणाचे पूर पाणी या भागात गेल्यास सदर गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आसून म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे. भोजापूर धरणाच्या कालव्याद्वारे नांदूरशिंगोटे व दोडी परिसर या गावाच्या तलावांमध्ये पूरपाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी होती. कालव्यास पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आमदार वाजे यांच्या मागणीचा विचार होऊन पाटबंधारे विभागाकडून पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी (दि.२५) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भोजापूर धरणावरील गेट फिरवून पाणी कालव्याला सोडण्यात आले. याप्रंसगी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, शाखा अभियंता बी. डब्ल्यु. बोडके, बी.के.आचट, नागेश शेळके ,रामदास सानप, प्रदीप मुंगसे, अरुण शेळके, किरण शेळके,किरण आव्हाड, योगेश शेळके, महादू शेळके, आदि यावेळी उपस्थित होते. नांदूर व दोडी या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. १०० ने क्युसेस कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.