खांब पडल्याने भोजापूर धरणातील पाणीयोजना संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:17 PM2020-06-04T21:17:43+5:302020-06-05T00:31:00+5:30
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक खांब पडल्याने या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील अशी माहिती उपकार्यकारी अभियंता खैरनार यांनी दिली. दरम्यान, वाड्या वस्त्यांवरील वीजपुरवठा बंद झाला आहे. भोजापूर धरणातील पाणीयोजना बंद असल्याने या योजनेतील गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भोजापूर परिसरातील वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके यांनी केली आहे. ग्रामस्थांनी काटकरीने पाणी वापरण्याचे आवाहन शेळके यांनी केले आहे.
१० वीज उपकेंद्र सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
गुरुवारी सायंकाळी आलेल्या निसर्ग चक्रवादळाने तालुक्यातील सुमारे ७० वीजेचे खांब पडले होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी १० वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाल्याने तालुका अंधारात होता. उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या मार्गदर्शनासाठी सुमारे १२५ वीज कर्मचारी रात्री ३ वाजेपर्यंत काम करीत होता. त्यानंतर काही भागातील वीजपुरवठा सुुरु झाला तर शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा सुरु झाला होता. भोजापूर खोरे परिसरात सर्वाधिक वीजेचे खांब पडले होते.
----------------------
‘ वादळामुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे ७० वीजेचे खांब पडले आहेत. सुमारे १२५ कर्मचारी रात्र्दिवस काम करीत आहेत. अजूनही काही भागातील वीजेचे खांब व तारा पडल्या असल्यास शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधित वायरमन किंवा वीज वितरण कंपनीत देऊन सहकार्य करावे. त्यामुळे लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचे नियोजन करता येईल
- ऋषीकेश खैरनार, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, सिन्नर