अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:20 AM2021-09-09T04:20:21+5:302021-09-09T04:20:21+5:30

मूलबाळ होत नाही म्हणून बनावट पीडित महिलेला पतीसह अंनिसने समस्या निवारणासाठी संशयित भोंदू गणेश महाराज याच्याकडे मंगळवारी पाठवून सापळा ...

Bhondubaba has been remanded in police custody for three days | अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Next

मूलबाळ होत नाही म्हणून बनावट पीडित महिलेला पतीसह अंनिसने समस्या निवारणासाठी संशयित भोंदू गणेश महाराज याच्याकडे मंगळवारी पाठवून सापळा रचला होता. या सापळ्यात भोंदूबाबा अडकला. यावेळी भोंदूबाबाने सुरुवातीला पूजाविधीसाठी ५० हजारांची मागणी केली होती तसेच एकांतात हातातील अंगठी तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघडकीस आला होता. या प्रकारात समितीने पोलिसांना बाबाची आक्षेपार्ह संवादाची रेकाॅर्डिंग ध्वनिफित दिली असून, महिलेनेदेखील जबाब नोंदविला आहे.. यानुसार पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेत अटक केली.

तांत्रिकदृष्ट्या पुराव्यांची जुळवाजुळव तसेच अंधश्रद्धेचा फायदा घेत भोंदूबाबाने अशा किती लोकांची फसवणूक केली आहे, याची चौकशी करण्याकरिता पोलिसांच्या वतीने सरकार पक्षाकडून पोलीस कोठडीची मागणी न्यायालयापुढे करण्यात आली. न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडीत भोंदूबाबाला ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, या तीन दिवसांमध्ये या गुन्ह्यात पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचतो आणि भोंदूबाबाविरोधी अजून नेमके काय समोर येणार? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत.

---इन्फो--

भोंदूबाबाच्या फ्लॅटमधून गंडे-तोडे, ताईत जप्त

स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या भोंदू संशयित गणेश जोशी महाराज याने जेहान सर्कलवरील सुमंगल अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील सहाव्या क्रमांकाचा फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला होता. पोलिसांनी या फ्लॅटची झडती घेत पंचनाम्यात विविध प्रकारचे तंत्रमंत्र, तोटके सांगणारी पुस्तके, ताईत, गंडेतोडे, कुंडली नकाशे आदी वस्तू जप्त केल्या आहेत.

080921\08nsk_30_08092021_13.jpg

भोंदूबाबा

Web Title: Bhondubaba has been remanded in police custody for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.