पाणी योजनेच्या कामाचे अनकाई येथे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:35 PM2020-02-17T22:35:00+5:302020-02-18T00:26:48+5:30
येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.
नगरसूल : येवला तालुक्यातील येथील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी अनकाई गावाला मिळणार असून, यामुळे गावाची टँकरमुक्ती होणार आहे. या योजनेतून पाणी जोडण्याच्या कामाचे भूमिपूजन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले.
३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणी देण्याची मागणी सरपंच डॉ. सुधीर जाधव यांनी भुजबळ यांच्याकडे केली होती. तसेच आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्याने या कामाला मंजुरी मिळाली आहे. यावेळी धनगर समाजबांधवांच्या वतीने भुजबळ यांना घोंगडी भेट देत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, कृषी सभापती संजय बनकर, स्थायी समितीचे सदस्य महेंद्र काले, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, दत्तात्रय वैद्य, शिरीष दायमा, किसन धनगे, नंदकुमार अट्टल, उपसरपंच राहुल देवकर, दीपाली वैद्य, प्रतिभा वैद्य, बेबी परदेशी, नगिनाबाई कासलीवाल, राजाराम पवार, सूर्यभान गांगुर्डे, अशोक बोराडे, मंदाबाई घोंगडे, सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण गोसावी, उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, गणपत देवकर, बारकू देवकर, वाल्मीक जाधव आदी उपस्थित होते.