भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:27 AM2019-08-12T01:27:22+5:302019-08-12T01:28:25+5:30

एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.११) बेड्या ठोकल्या.

Bhoondubaba's two companion ships | भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या

भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या

Next
ठळक मुद्देतिघे फरार : भोंदूबाबाला गजाआड करण्याचे आव्हान

गंगापूर : एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.११) बेड्या ठोकल्या.
या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला संशयित राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी भोंदूबाबा अद्याप फरार असून, त्याचे तिघे साथीदारही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मागील वर्षभरापासून भोंदूबाबा ध्रुवनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये पीडित महिलेसह राहात होता. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष संशयित भोंदूबाबा याच्यासह त्याच्या साथीदारांनी दाखविले. या आमिषाला बळी पडलेल्या महिलेस शिर्डी, सापुतारा येथे घेऊन जात पूजा केली. तसेच भोंदूबाबाने महिलेसोबत लग्न केल्याचे भासवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केला. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात बलात्कार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार संशयितांमध्ये भोंदूबाबासह एका महिलेचा समावेश आहे.

Web Title: Bhoondubaba's two companion ships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.