मुद्रणालय मजदूर संघ अध्यक्षपदी भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:51 AM2018-02-25T00:51:43+5:302018-02-25T00:51:43+5:30
आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहे.
नाशिकरोड : आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर संघाचे १४ पदाधिकारी व १६ कार्यकारिणी सदस्य अशा ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहे. आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाच्या ३० जागांसाठी होणाºया त्रैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या १० मार्च रोजी मतदान होणार आहे. मजदूर संघ पदाधिकाºयांच्या १४ जागा व कार्यकारिणी सदस्यांच्या १६ जागा अशा एकूण ३० जागांसाठी एकूण १,३९५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली. यामध्ये मजदूर संघाच्या अध्यक्षपदी आपला व कामगार पॅनलकडून हिंद मजदूर सभेचे राष्टÑीय खजिनदार जे. आर. भोसले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्याध्यक्ष - १७ उमेदवारी अर्ज, सरचिटणीस- १५, खजिनदार- २९, उपाध्यक्ष- ४ जागा- ४९, जॉर्इंट सेक्रेटरी- ६ जागा- १६१ अर्ज व कार्यकारिणी सदस्यांच्या १६ जागांसाठी ११२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये कार्यकारी सदस्य पदाचा एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला. पदाधिकारी-१४ जागा व कार्यकारिणी सदस्य-१६ जागा अशा एकूण ३० जागांसाठी १,३९४ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मजदूर संघासोबत वर्क्स कमिटीची द्विवार्षिक निवडणूकदेखील होत आहे. त्यामध्ये आयएसपीमधील कंट्रोल, टेक्निकल, वर्कशॉप, सीएसडी व स्टोअर विभागाकरिता ११ जागा, तर स्टाफकरिता तीन जागा अशा एकूण १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर सीएनपीमधील कंट्रोल, टेक्निकल, वर्कशॉप, स्टोअर विभागासाठी १३ जागा व स्टाफसाठी दोन अशा एकूण १५ जागांसाठी १० मार्चलाच मतदान होणार आहे. वर्क्स कमिटीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवार (दि.२६) अंतिम मुदत आहे.