ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत भुजबळ चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:41+5:302021-05-05T04:22:41+5:30
येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, तसेच लसीकरण याबाबतचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ऑक्सिजनचा आवश्यक ...
येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, तसेच लसीकरण याबाबतचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर, तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. बंद असलेले व्हेंटिलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत. ड्युरा आणि जम्बो सिलिंडरची आवश्यकता असल्यास मागणी कळविण्यात येऊन उपलब्ध करून घेण्यात यावेत. शहरात प्रत्येक वार्डात नगरसेवकांनी, तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.
इन्फो
खरीप हंगामाचा आढावा
खरीप पिकांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाकडून केलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन तालुक्यात खते, बियाणे यांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा, तसेच खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री भुजबळ संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
फोटो- ०३ भुजबळ येवला
कोरोनासंबंधी आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, समवेत अधिकारी.
===Photopath===
030521\03nsk_39_03052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ भुजबळ येवला कोरोनासंबंधी आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी.