भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:49 AM2018-05-05T01:49:43+5:302018-05-05T01:49:43+5:30

नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला.

Bhujbal gets bail: Funeral for workers; Shouting sloganeering in Bhujbal Farm | भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Next
ठळक मुद्देन्यायालयीन लढाई सुरू असल्याने अखेरीस शुक्रवारी जामिनाचा निर्णय ढोल-ताशा वाजवत फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले

नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. भुजबळ फार्म तसेच राष्ट्रवादी भवनासह सिडको परिसरातील विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून तसेच पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच भुजबळ यांच्या जामिनावरील सुटकेची शक्यता वर्तवली जात होती. न्यायालयीन लढाई सुरू असल्याने अखेरीस शुक्रवारी (दि. ४) जामिनाचा निर्णय झाला आणि भुजबळ समर्थक तसेच स्थानिक राष्टÑवादी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन केल्याचे समजताच गेल्या दोन वर्षांपासून शांत असलेल्या सिडकोतील भुजबळ फार्म येथे राष्टÑवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ढोल-ताशा वाजवत फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अ‍ॅड. रवींद्र पगार, नाना महाले, जयंत जाधव, सुनील वाजे, आनंद सोनवणे, विजय देवरे, संतोष सोनपसारे, गजानन शेलार, गुरुमित बग्गा, निवृत्ती अरिंगळे, किशोर घाटे, मकरंद सोमवंशी, कुणाल बागडे, अमोल नाईक,अतुल भामरे, नंदन भास्कर, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, योगेश कमोद, बाळासाहेब कर्डक, भालचंद्र भुजबळ, अप्पा कमोद, अमर वझरे, मुक्तार शेख, तात्या जगझाप, दशरथ खेडकर, ज्ञानेश्वर महाजन, समाधान जेजुरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिडको परिसरात जल्लोष, पेढेवाटप
सिडको परिसरातील राष्टÑवादी कार्यालय, राणेनगर, त्रिमूर्ती चौक, पवननगर आदीसह सिडको व अंबड परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला, तसेच पेढ वाटप करण्यात आले. राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने कार्याध्यक्ष वैभव देवरे यांनी राणेनगर येथे ढोल-ताशे वाजवत फटाके फोडून मिठाई वाटप केली. याप्रसंगी गणेश जाधव, रवींद्र गामणे, डॉ. शिरोडे, मिलिंद भामरे, हर्षल चव्हाण, निखिल पवार ,राहुल पाटील, अजय गोसावी आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कार्यालय
राणा प्रताप चौक, जिव्हाळा संकुल येथील राष्टÑवादी कार्यालय येथे प्रदेश सरचिटणीस नाना महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, अमोल महाले, सोमनाथ बोराडे, पुष्पा आव्हाड, विशाल डोके, कुणाल बागडे, मुकेश शेवाळे, रवींद्र शिंदे, गिरीश पवार, भूषण देव, प्रतिभा भुजबळ, अक्षय विभुते, संगीता चौधरी, संगीता गांगुर्डे, निशा दोंदे, कामिनी वाघ, हीना शेख, मंगला मोरे, परविन मनियार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bhujbal gets bail: Funeral for workers; Shouting sloganeering in Bhujbal Farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.