भुजबळ ग्यानदासांच्या दारी
By Admin | Published: August 9, 2015 11:47 PM2015-08-09T23:47:22+5:302015-08-09T23:47:59+5:30
सदिच्छा भेट : सिंहस्थ कुंभमेळा घरचे कार्य
भुजबळ ग्यानदासांच्या दारीसदिच्छा भेट : सिंहस्थ कुंभमेळा घरचे कार्यनाशिक : साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी पूर्णत्वास आली असताना माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्व नाशिककरांनी घरचे कार्य मानून यात सहभागी व्हावे. आपण सर्व यजमान असून, हजारो साधू-महंत आणि लाखोंच्या संख्यने येणारे भाविक हे आपले अतिथी आहेत.
तपोवनातील मकवाना यांच्या निवासस्थानी ग्यानदास महाराज सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी थांबले असून, या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी रोज लोकप्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने येतात. छगन भुजबळ यांनी ग्यानदास महाराजांची सदिच्छा भेट घेऊन आपणास काही अडचणी आहेत काय, असे विचारले असता ग्यानदास महाराज म्हणाले की ‘कोयी समस्या नही, सब कुछ अच्छा चल रहा है; सभी सुविधा प्राप्त हो रही है’ असे सांगितले.
याप्रसंगी भुजबळ म्हणाले की, आपण नाशिककर लोक भाग्यवान आहोत, कारण संपूर्ण विश्वात फक्त चार ठिकाणी कुंभ होतो. त्यात नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असून, सिंहस्थामुळे लाखो भाविक येणार असल्याने शेकडो कोटींची उलाढाल होईल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. सर्वांनी पक्ष, धर्म, जात तसेच सर्व मतभेद बाजूला ठेवून या सोहळ्यासाठी सेवा दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी महंत भक्तिचरणदास, आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, धनंजय बेळे आदिंसह लोकप्रतिनिधी अधिकारी व महंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सिंहस्थातील प्रशासकीय कामे चांगली झाली असून, सर्वांचे सहकार्य मिळत आहे. तसेच नाशिककर लोक पुण्यवान असून, या पुण्यभूमीत साधू-संतांचा मोठा सन्मान होतो. नाशिकमध्ये वसंतऋतूचा कायम वास असतो. म्हणून कोकीळ पक्षी कोणत्याही ऋतूत येथे गातो.
- महंत ग्यानदास