महापालिकेची कारवाई रोखण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे भुजबळ यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 07:24 PM2019-12-09T19:24:43+5:302019-12-09T19:29:17+5:30
नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कारवाई रोखण्यासाठी साकडे घातले.
नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कारवाई रोखण्यासाठी साकडे घातले.
महापालिकेला सांगून चुकीची कारवाई स्थगित केली जाईल आणि ज्यांची बेकायदा बांधकामे आहेत, त्यांच्यावरच केवळ कारवाई केली जाईल असे आश्वासन छगन भुजबळ यांनी यावेळी सराफ व्यवसायिकांना दिले.
सराफ बाजारात महापालिकेने फुल बाजार हटविल्यानंतर अनेकदा सराफ व्यवसायिकांनी देखील बेकायदा बांधकामे केल्याचे आरोप करण्यात येत होते. त्यानंतर महापालिकेने नोटिसांचा धडका लावला आणि तब्बल २०० व्यवसायिकांना नोटिसा पाठविल्या आणि बेकायदा बांधकामांबाबत जाब विचारला होता. नोटिस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत महापालिकेत समक्ष हजर राहून उत्तर न दिल्यास बेकायदा बांधकामे पाडण्यात येतील आणि त्याचा खर्च संबंधीत व्यवसायिकांकडून वसुल केला जाईल असे देखील नोटिसीत नमुद करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्यांनी कोणतेही बेकायदा बांधकामे केली नाहीत, त्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे होते. त्यामुळे अशाप्रकारची अन्याय्य कारवाई करू नये अशी मागणी आज सराफ व्यावसायिकांनी भुजबळ फार्म येथे छगन भुजबळ यांची भेट घेतली.
यासंदर्भात सराफ व्यवसायिकांच्या अडचणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी समजावून सांगितल्या आणि ज्यांनी बांधकामे केली नाहीत, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगितले. कृष्णा नागरे, सचिन साकुळकर, लकी नागरे, राजेंद्र शहाणे, श्याम रत्नपारखी, अजय उदावंत, आडगावकर बंधु, मयुर शहाणे, मनोज साकुळकर, योगेश मैंद यांनी देखील अडचणी मांडल्या.