पत्रकारांना लस देण्यासाठी भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:51+5:302021-05-11T04:15:51+5:30

भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी ...

Bhujbal urges CM to vaccinate journalists | पत्रकारांना लस देण्यासाठी भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

पत्रकारांना लस देण्यासाठी भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next

भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांनादेखील तातडीने लस देणे गरजेचे आहे. देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपणदेखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा, अशी विनंतीही भुजबळ यांनी केली आहे.

Web Title: Bhujbal urges CM to vaccinate journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.