भुजबळ यांची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:27 AM2018-10-30T01:27:26+5:302018-10-30T01:27:54+5:30

माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़

 Bhujbal's 'Y Plus' status will be protected | भुजबळ यांची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम

भुजबळ यांची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम

googlenewsNext

नाशिक : माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़  मनुस्मृतीचे दहन तसेच संभाजी भिडे यांना विरोध करीत असल्याने माजी मंत्री भुजबळ यांना शिवराळ भाषेत धमकीचे पत्र पाठविण्यात आले होते़ या पत्रामध्ये अन्यथा तुमचाही दाभोळकर-पानसरे करण्याची उघड धमकी देण्यात आली होती़ तसेच भिडे गुरुजींना विरोध केल्यास त्यांचे प्रतिष्ठाण व धारकºयांचे ताकद काय असते ते दाखविण्याबाबत धमकावण्यात आले होते़ या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले होते़ या निवेदनात सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती, तर अशा धमक्यांना जुमानत नसल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली होती़ दरम्यान, भुजबळ यांना पाठविण्यात आलेले धमकीचे पत्राबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सद्य:स्थितीत सुरक्षाव्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही़

Web Title:  Bhujbal's 'Y Plus' status will be protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.